खळबळजनक घटना : कोकणात पर्यटनासाठी आलेल्या जोडप्याने नदीत उडी घेत संपवले जीवन ; नेमकं काय प्रकरण?
खळबळजनक घटना : कोकणात पर्यटनासाठी आलेल्या जोडप्याने नदीत उडी घेत संपवले जीवन ; नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
कोकणात पर्यटनासाठी आल्यानंतर धुळे जिल्ह्यातील एका जोडप्याने चिपळूण येथील विशिष्ठी नदीत उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये दोघांनी वाशिष्ठी नदीत उडी टाकून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस  प्रशासन आणि आपत्ती बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. 

तरुणी बुडतानाचा व्हिडिओ व्हायरल  झाला असून नदीत उडी टाकणारे दोघेही धुळे येथील असल्याची माहिती आहे. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट असून चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

चिपळूणमधील गांधेश्वर मंदिराच्या येथील ही घटना असून तरुणी पाण्यात बुडताना व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

दरम्यान, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी, चिपळून पोलीस अधिक तपास करत आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group