भाजपाचा विजयरथ सुसाट ! मतदानाआधीच महापालिकेत पारडं  जड, ११ उमेदवार बिनविरोध जिंकले
भाजपाचा विजयरथ सुसाट ! मतदानाआधीच महापालिकेत पारडं जड, ११ उमेदवार बिनविरोध जिंकले
img
वैष्णवी सांगळे
मतदानाआधीच महापालिकेत भाजपाचा विजयरथ वेगाने धावतोय. महापालिका निवडणुकीत भाजपाने मतदानापूर्वीच अकरा जागांवर विजय मिळवला.  कल्याण डोंबिवली, धुळे, पनवेल, भिवंडी या महापालिकांमध्ये भाजपाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाच्या रेखा चौधरी, आसावरी नवरे आणि रंजना पेणकर या विजयी झाल्या आहेत. अर्ज छाननी झाली त्याच दिवशी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.अर्ज मागे घेण्यास गुरूवारपासून (१ जानेवारी) सुरूवात झाली. त्यानंतर भाजपाच्या आणखी दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. यामध्ये मंदा सुभाष पाटील आणि ज्योती पवन पाटील या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही खातं उघडलं

पनवेलमध्येही भाजपाने अर्ज छाननीच्या दिवशीच एका जागेवर विजय मिळवला. प्रभाग क्रमांक १८ मधून नितीन पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत. शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाला

धुळे महापालिकेमध्येही भाजपाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी सुरेखा उगले या विजयी झाल्या. भाजपाच्या उज्ज्वला भोसले या प्रभाग क्रमांक १ मधून बिनविरोध निवडल्या गेल्या. ज्योत्सना पाटील याही विजयी झाल्या आहेत.

जळगाव महापालिकेत भाजपाच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे याही बिनविरोध निवडून आल्या आहेत. भिवंडी महापालिकेत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमीत पाटील हे बिनविरोध निवडू आले आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group