मोठी बातमी ! ३२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची संभाव्य तारीख समोर
मोठी बातमी ! ३२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची संभाव्य तारीख समोर
img
वैष्णवी सांगळे
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.  नाशिक,रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर आणि अमरावती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, ज्यांची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.  

अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळीची संभाव्य तारीख समोर आली आहे. ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समितिच्या निवडणुका ५ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी ११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती दिली. हे सर्वजण आता दोन आठवड्यात बदलीच्या ठिकाणी हजर होतील, अने कार्यभार सांभाळतील. त्यानंतर दैनंदिन अहवाल विभागीय आयुक्तांकडून मागवण्यात येईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडू शकतो, अशी माहिती मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबर अखेरीस अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाईल, असे सांगण्यात येतेय. 

पाच डिसेंबरच्या आसपास राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात. त्यानंतर सात दिवस अर्ज स्विकृतीसाठी देण्यात येतील. त्यानंतर सात दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. छाननी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. ३१ डिसेंबरच्या आतमध्ये जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करण्याचे आयोगाने ठरवले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group