पालिका निवडणुकीत MIM चा डंका, मालेगाव ते मुंबई MIM चे किती उमेदवार जिंकले ?
पालिका निवडणुकीत MIM चा डंका, मालेगाव ते मुंबई MIM चे किती उमेदवार जिंकले ?
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील अनेक महापालिकांचा निकाल जवळपास जाहीर झाला आहे. बहुसंख्य महापलिकांमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान राज्यात एमआयएम या पक्षाने देखील मोठे यश मिळवले आहे. 

एमआयएमचे संपूर्ण राज्यात एकूण 74 उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये मुंबईत एमआयएमचे पाच उमेदवार आघाडीवर आहेत. संभाजीनगरात एमआयएमचे 24 उमेदवार निवडून आले आहेत. अमरावतीत एमआयएमचे 6 जण निवडून आले आहेत. मालेगावत एमआयएमचा 20 जागांवर विजय झाला आहे. इथे हा पक्ष सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरू शकतो.नांदेड महापालिकेत एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. येथे एमआयएमचे 14 नगरसेवक निवडून आले आहेत. धुळे महानगरपालिकेतही एमआयएमचा 8 जागांवर विजय झाला आहे. जालन्यात एमआयएमचा दोन जागांवर विजय झाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group