मोठी बातमी ! 'या' निवडणुकीसाठी शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा
मोठी बातमी ! 'या' निवडणुकीसाठी शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा
img
वैष्णवी सांगळे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मोर्चेबांधणीची जोरदार तयारी सुरु असताना शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी शिंदेसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. नुकताच शिवसेना नेत्यांची महत्वाची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिक्षण आणि पदवीधर निवडणूकीसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमिवर शिंदेंच्या शिवसेनेची पूर्व/ पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख, मंत्री, आमदारांची महत्वाची बैठक नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली.

या बैठकित औरंगाबाद, पुणे, नागपूर येथील पदवीधर आणि पुणे अमरावती शिक्षक मतदार निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्येही रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये महायुतीत या निवडणुका लढवतील अशी आशाही धुसर असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली.

या सूचना करताना निवडणुका या युतीत अन्यथा स्वतंत्र लढण्यासाठी तयारीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group