आगामी महापालिका निवडणुकीवर पुन्हा संकट येण्याची चिन्ह आहेत. मतदार याद्यांचा घोळ अजून निस्तारलेला नाही. त्यामुळे महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे.
मतदार याद्या जाहीर करण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर होती. त्यानंतर निवडणूक पुढील आठवड्यात घोषीत होण्याची शक्यता होती. पण अजून निवडणूक याद्यांचा घोळच निस्तारलेला नसल्याने आणि मतदार यादी जाहीर करण्यासाठी अंतिम मुदत वाढवण्यात देण्यात आल्याने महापालिका निवडणूक पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महापालिकांच्या अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास ५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने अखेरच्या टप्प्यात याविषयीचा आदेश दिला. मतदार याद्या जाहीर करण्यास उशीर होत असल्याने आणि त्यावर पुन्हा आक्षेप आणि हरकती आल्यास महापालिका निवडणूक कार्यक्रमात व्यत्यय येण्याची आणि महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महापालिकांच्या मतदार याद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ही मुदत वाढ देण्यात आली आहे. जर त्यानंतर राजकीय पक्षांनी तीव्र आक्षेप घेतल्यास अथवा काही उमेदवार या मतदार याद्यांमधील घोळाप्रकरणी न्यायालयात गेल्यास संभावित वेळापत्रक सुद्धा बाधित होण्याची भीती व्यक्त होत आहे.