महापालिका निवडणुकांच्या मतदानाआधीच भाजप , शिवसेना ( शिंदे गट )पाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील विजयी गुलाल उधळला आहे. अहिल्यानगर येथे अजित पवार गटाने पहिले खाते उघडले आहे.
अहिल्यानगर महापालिकेचे उमेदवार कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक ८ ड मध्ये बिनविरोध निवड झाली आहे. कुमार वाकळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांचा एकमेव अर्ज वैध झाला होता. पोपट कोलते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ ड मध्ये कुमार वाकळे बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खाते उघडले आहे. याठिकाणी विजयी जल्लोष करण्यात आला. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आनंदाची बातमी मिळाली.