मोठी बातमी ! मनपा निवडणुकांची आज घोषणा, आजपासूनच आचारसंहिता लागणार ?
मोठी बातमी ! मनपा निवडणुकांची आज घोषणा, आजपासूनच आचारसंहिता लागणार ?
img
वैष्णवी सांगळे
राज्य निवडणूक आयोगाची आज (15 डिसेंबर) पत्रकार परिषद होणार आहे. सायंकाळी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे ही पत्रकार परिषद होईल. महानगरपालिका निवडणुका संदर्भात निवडणूक आयोगाकडून आज घोषणा होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. काल राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं. त्यानंतर आज राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली आहे. 

व्लादिमीर पुतिन करणार भारताला मालामाल, तब्बल ३०० वस्तूंची यादी तयार

त्यामुळे महानगपालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आजपासूनच आचारसंहिता लागणार की काय? हे राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतरच समोर येईल. 

मुंबई, नाशिक, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषदेत केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे सांयकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणार आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group