भाजपला धक्का ! ऐन निवडणुकीत बड्या नेत्याचा तडकाफडकी पदाचा राजीनामा
भाजपला धक्का ! ऐन निवडणुकीत बड्या नेत्याचा तडकाफडकी पदाचा राजीनामा
img
वैष्णवी सांगळे
उद्या मनपा निवडुकांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील अनेक उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे. तर १६ जानेवारीला महापालिका निवडणुकांचा निकाल लागणार आहे. दरम्यान राज्यात एकीकडे महापालिकेच्या निवडणुकीची लगबग असताना दुसरीकडे मालवणमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

गेली २२ वर्षे भारतीय जनता पार्टीत एकनिष्ठपणे कार्यरत असणारे भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जिल्हा नेतृत्वाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि अकार्यक्षमतेमुळे मालवण नगरपालिकेत भाजपचा पराभव झाला असून राणे समर्थक व जुन्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देऊन समांतर यंत्रणा राबविण्यात आली असा गंभीर आरोप मोंडकर यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group