मालवण मधील घटनेच्या निषेधार्थ कळवणमध्ये मुक आंदोलन
मालवण मधील घटनेच्या निषेधार्थ कळवणमध्ये मुक आंदोलन
img
दैनिक भ्रमर
मालवण राजकोट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ कळवणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,अजित पवार गटातर्फे आमदार नितीन पवार,व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्रीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ मुक आंदोलन करण्यात आलं. पोलिस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. काळया फिती लावून आंदोलन करण्यात आलं. शासनाने  या घटनेची गंभीर दखल घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दोषींवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादी टाकण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)गटतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बोरसे यांना निवेदन देण्यात. याप्रसंगी कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार,बाजार समितीचे सभापती धनंजय पवार,धीरेन पगार,संदीप(बंटी)पगार, कळवण नगरपंचायत चे सर्व नगरसेवक,आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे  पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group