''शिवाजी महाराजांची एकदा नव्हे शंभरवेळा माफी मागतो'' : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
''शिवाजी महाराजांची एकदा नव्हे शंभरवेळा माफी मागतो'' : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
img
दैनिक भ्रमर
राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ''छत्रपती शिवाजी महाराजांची एकदा नव्हे तर शंभरवेळा माफी मागतो'' असं म्हटलंय. दरम्यान , शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून राज्य सरकारच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन काढलं जात आहे. सरकारने माफी मागावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी  बोलताना मालवण दुर्घटनेसंदर्भात स्पष्टपणे बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांची एकदा नव्हे तर शंभरवेळा माफी मागतो असं म्हटलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की, ‘टीका करायला त्यांच्याकडे वेळच वेळ आहे, त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. झालेली घटना योग्य नाही, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. तो पुतळा नेव्हीकडून उभारला गेला होता, त्याचं डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं’

तसेच , “मालवणमध्ये 45 किलोमीटर प्रती तास असा वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत आहे, हा पुतळा आम्ही पुन्हा दिमाखात आणि मजबुतीने उभा करू असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

या विषयी अधिक माहिती अशी की , वर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी सिंधुदुर्ग पोलीस शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांचा शोध घेत आहे. पुतळा पडल्यानंतर वरील दोघांनावराही भादवी कलम 307 नुसार मालवण पोलीस स्थानाकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून दोन्ही संशयित आहेत फरार आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group