मोठी दुर्घटना टळली : धावपट्टीला स्पर्श करताच विमान एका बाजूला झुकले, अन् मग....; व्हिडीओ आला समोर
मोठी दुर्घटना टळली : धावपट्टीला स्पर्श करताच विमान एका बाजूला झुकले, अन् मग....; व्हिडीओ आला समोर
img
Dipali Ghadwaje
काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये झालेल्या बोईंग विमानाच्या अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यात टळली.  इंडोनेशियातील टांगेरंग शहरातील विमानतळावर एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळला. विमान धावपट्टीवर उतरत असतानाचा वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे विमान डगमगले आणि घासले गेले. 

मिळालेल्या माहितीनुसार , बतिक एअर कंपनीचे बोईंग ७३७ विमान अपघातग्रस्त होता होता राहिले. इंडोनेशियातील टांगेरंग शहरातील सोएकार्नो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. विमानाचा धावपट्टीवर उतरत असतानाचा व्हिडीओही समोर आला आहे.

बतिक एअर कंपनीच्या बोईंग ७३७ या विमानाला शनिवारी (२८ जून) खराब हवामानाचा फटका बसला. इंडोनेशियातील सोएकार्नो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना दुर्दैवी घटना घडता घडता टळली.

बतिक एअर विमानाचा व्हिडीओ विमानाचा लँडिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. पाऊस सुरू असून, दृश्यमानता कमी झालेली असल्याचे दिसत आहे. विमानाचे मागील चाके धावपट्टीला स्पर्श करतात तेव्हा ते हेलकावा खाते. त्यानंतर ते एका बाजूने झुकत जाते. विमान इतके झुकते की त्याचे इंजिन जमिनीला लागण्याची शक्यता होती. पण, पायलटने प्रसंगावधान राखल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली.

बतिक एअर कंपनीचे प्रवक्ते दणांग मंडाला प्रीहांतोरो यांनी सांगितले की, बोईंग ७३७ विमान (क्रमांक पीके-एलडीजे) वादळी हवामान असताना उतरत होते. मात्र वेगाने वारे वाहत असल्याने त्या दाबामुळे विमान एका बाजूला ढकलले गेले. विमानाचे एक पंख धावपट्टीला लागले होते. त्यामुळे विमानात प्रचंड गोंधळ उडाला, पण वैमानिकांनी कठीण प्रसंगात धीर ढळू न देता सुरक्षितपणे उतरवले.

या घटनेनंतर बतिक एअर कंपनीचे अभियांत्रिकी पथक विमानतळावर दाखल झाले. या विमानाची पूर्णपणे पाहणी करण्यात आली. त्यात विमानाचे मोठे नुकसान झाले नसल्याचे दिसून आले.

इतर बातम्या
मोठी बातमी :

Join Whatsapp Group