Nashik Crime : हॉस्पिटल चालू ठेवण्यासाठी डॉक्टरकडे मागितली ५ लाखांची खंडणी
Nashik Crime : हॉस्पिटल चालू ठेवण्यासाठी डॉक्टरकडे मागितली ५ लाखांची खंडणी
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- हॉस्पिटल चालवायचे असेल तर डॉक्टरकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागणार्‍यास पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी डॉ. देवेंद्र निवृत्ती खैरनार (रा. मनोहर गार्डन शेजारी, गोविंदनगर) यांचे हिरवेनगर, वडाळा रोड नागजी सिग्नलजवळ फोर्च्युन हॉस्पिटल आहे. आरोपी अंजुम मकरानी याने दि. २४ ते ३० जून दरम्यान हॉस्पिटलमध्ये येऊन ‘हॉस्पिटलविरोधात बर्‍याच तक्रारी असून, त्यामुळे हे हॉस्पिटल बंद करू’ अशी धमकी फिर्यादी डॉ. देवेंद्र खैरनार यांना दिली.

हेही वाचा : नाशकात ठाकरे व शरद पवार गटाला धक्का ; "या" माजी नगरसेवकांचा आज भाजपात प्रवेश

तसेच हे हॉस्पिटल चालु ठेवायचे असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणून खंडणी मागितली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात डॉ. खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अंजुम मकरानी याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

हेही वाचा : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखपदी "यांची" नियुक्ती
इतर बातम्या
Join Whatsapp Group