शिवसेना ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला होता. आज शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गणेश गिते, नुकतेच महानगरप्रमुख झालेले मामा राजवाडे, श्रमिक सेनेचे जिल्हाप्रमुख अजय बागूल, मनिष बागूल, शिवसेना उबाठा गटाचे लोकसभा संघटक भगवंत पाठक, हिंदवी प्रतिष्ठानचे सागर देशमुख, गुलाब भोये, माजी नगरसेवक कमलेश बोडके, प्रशांत दिवे, सचिन मराठे, कन्नू ताजने, माजी नगरसेविका सीमा ताजने, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश मोरे यांच्यासह अमोल पाटील, गौरव बागूल, नितीन शेणगे, किशोर बागूल, युवराज पेखळेे, नवनाथ सानप, पराग बागूल, अनिल शेंडगे, सागर मगर, दिनेश जाधव, संदीप जाधव, सुशांत पाटील, राहुल कदम, कृष्णा सानप, हेमराज गायकवाड हे आज भाजपात प्रवेश करत आहे.
नाशकात महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. ठाकरे गटाला निवडणुकीपूर्वीच मोठी गळती लागली असून, आतापर्यंत सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, बबनराव घोलप, अशोक सातभाई, अशोक मुर्तडक यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. येणार्या काळात आणखी कोणते नेते ठाकरे गटातून बाहेर पडतात हे लवकरच समोर येईल.
खा. संजय राऊत यांची भाजपवर टिका
या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी भाजपवर टिका करणारी पोस्ट आज सकाळी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘भारतीय जमवा जमव पार्टीची कमाल आहे. नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकार्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलीस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले. क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार (भाजपासाठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत. भारतीय जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे. सत्ता, पैसा, दहशत! दुसरे काही नाही!’.