इगतपुरीत तीस वर्षांच्या सत्तेचा सुपडा साफ ; नगराध्यक्षपदी
इगतपुरीत तीस वर्षांच्या सत्तेचा सुपडा साफ ; नगराध्यक्षपदी "यांचा" विजय
img
दैनिक भ्रमर
इगतपुरी (भास्कर सोनवणे) - इगतपुरी नगरपरिषदेमध्ये तीस वर्षाच्या सत्तेला झूगारून देत परिवर्तन झाले आहे.

नगराध्यक्षपदी शालिनी संजय खातळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या मधूमालती मेंद्रे यांचा पराभव केला. तिसऱ्या स्थानी वंचितच्या अपर्णा चंद्रशेखर धात्रक तर चौथ्या क्रमांकावर राष्ट्रीय काँग्रेसच्या शुभांगी यशवंत दळवी ह्या फेकल्या गेल्या.

राष्ट्रवादी अप १३, शिवसेना शिंदे ५, भाजपा २, तर शिवसेना उबाठाला १ जागा तर भाजपाने २ जागा मिळवल्या आहेत. इंदिरा काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. तीस वर्षांपासून इगतपुरीवर सत्ता गाजवणारे संजय इंदुलकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अपचे मंगेश शिरोळे यांनी दारुण पराभवाची धूळ चाखायला लावली. संजय इंदुलकर यांनी ३० वर्षांपासून टक्कर देणारे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष फिरोजभाई पठाण यांचा दणदणीत विजय झाला.

मंगेश शिरोळे, भारती शिरोळे हे पतीपत्नी विजयी झाले. विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी जल्लोष केला. इगतपुरी नगरपरिषदेचे थेट नगराध्यक्षपद आणि १० प्रभागातील २१ नगरसेवकपदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज पडली. थेट नगराध्यक्ष, प्रभागनिहाय विजयी व पराभूत उमेदवार, त्यांना मिळालेली मते, त्यांचा पक्ष खालीलप्रमाणे आहेत. 

नगराध्यक्ष पद 
विजयी - शालिनी संजय खातळे, शिवसेना शिंदेपक्ष - 
पराभूत - मधूमालती रमेश मेंद्रे, भाजपा  
प्रभाग क्र. १ अ
विजयी - युवराज बाजीराव भोंडवे, राष्ट्रवादी अप 
पराभूत - अजय भागवत जगताप, भाजपा 
प्रभाग क्र. १ ब
विजयी - अंजुम अस्लम कुरेशी, राष्ट्रवादी अप 
पराभूत - मीराबाई देविदास सोपनर, भाजपा 
प्रभाग क्र. २ अ
विजयी - सागर अनिल आढार, राष्ट्रवादी अप 
पराभूत -  विजय निवृत्ती जाधव, भाजपा 
प्रभाग क्र. २ ब
विजयी -  नाझनीन असगर खान, राष्ट्रवादी अप
पराभूत - नाहिद सुबहानमिया पटेल, भाजपा 
प्रभाग क्र. ३ अ
विजयी - वैशाली सतीश कर्पे, शिवसेना शिंदे 
पराभूत -  वैशाली विजय आडके, भाजपा 
प्रभाग क्र. ३ ब
विजयी -  रोहिदास हरिश्चंद्र डावखर, शिवसेना शिंदे - 
मिळालेली मते - 416
पराभूत - संपत शंकर डावखर, भाजपा 
प्रभाग क्र. ४ अ
विजयी -  माला नंदू गवळे, शिवसेना शिंदे 
पराभूत -  अनिता सनी शिंदे, भाजपा 
प्रभाग क्र. ४ ब
विजयी - भूषण प्रभाकर जाधव, शिवसेना उबाठा 
पराभूत -  रमेश भास्कर खातळे, भाजपा 
प्रभाग क्र. ५ अ
विजयी -  उमेश अशोक कस्तुरे, शिवसेना शिंदे 
पराभूत -  विशाल रमेश चांदवडकर, भाजपा 
प्रभाग क्र. ५ ब
विजयी -  निकत वसीम सय्यद, राष्ट्रवादी अप 
पराभूत -  निलोफर मुन्ना शेख, भाजपा 
प्रभाग क्र. ६ अ
विजयी -  मयुरी राहुल पुरोहित, राष्ट्रवादी अप  
पराभूत -  सिद्धी गजानन शिरसाठ, भाजपा 
प्रभाग क्र. ६ ब
विजयी -  आशा सुनील थोरात, राष्ट्रवादी अप
पराभूत -  दुर्गा विलास बोरकर, भाजपा
प्रभाग क्र. ६ क
विजयी -  फिरोजभाई रमजान पठाण, राष्ट्रवादी अप  
पराभूत -  योगेश संजय चांदवडकर, अपक्ष 
प्रभाग क्र. ७ अ
विजयी -  सतीश सखाराम मनोहर, राष्ट्रवादी अप 
पराभूत - शशिकांत नारायण बर्वे, भाजपा
प्रभाग क्र. ७ ब
विजयी - भारती मंगेश शिरोळे, राष्ट्रवादी अप 
पराभूत -  वैष्णवी समीर यादव, शिवसेना उबाठा 
प्रभाग क्र. ८ अ
विजयी -  वंदना सुनील रोकडे, भाजपा
पराभूत -  रजनी गजेंद्र बर्वे, शिवसेना शिंदे
प्रभाग क्र. ८ ब
विजयी -  राजेंद्र सुरेश जावरे शिवसेना शिंदे 
पराभूत -  लक्ष्मण मंगळू भागडे, भाजपा 
प्रभाग क्र. ९ अ
विजयी -  आशा प्रशांत भडांगे, राष्ट्रवादी अप
पराभूत -  माधुरी चंद्रकांत आढाव, भाजपा 
प्रभाग क्र. ९ ब
विजयी -  मंगेश लक्ष्मण शिरोळे, राष्ट्रवादी अप 
पराभूत -  संजय संपतराव इंदुलकर, भाजपा 
प्रभाग क्र. १० अ
विजयी - ललिता नामदेव लोहरे, राष्ट्रवादी अप 
पराभूत - मंजुळा देवराम भले, भाजपा 
प्रभाग क्र. १० ब 
विजयी -  किरण लक्ष्मण बिन्नर, भाजपा
पराभूत -  शोभराज धनराज शर्मा, राष्ट्रवादी अप
इतर बातम्या
Join Whatsapp Group