नाशिक शहरात 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार
नाशिक शहरात 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : स्मार्ट सिटी कंपनीमार्फत फ्लोमीटर बसविण्याची कामे प्रस्तावित असून, त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शहरातील पाणी पुरवठाविषयक देखभाल दुरुस्तीची कामे करावयाची असल्याने शनिवारी (दि.२०) संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी (दि.२१) सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्र. १५ मधील द्वारका व गोडेबाबा जलकुंभ भरणाऱ्या ५०० मि. मी. व्यासाच्या गुरुत्ववाहिनीवर एम. एस. बँडचे काम करणे. प्रभाग क्र. २३ मधील सुचित्ता नगर जलकुंभ येथे एअर व्हॉल्व्ह दुरुस्त करणे, प्रभाग क्र. १६ मधील गांधीनगर जलकुंभ येथे ७०० मि. मी. व्यासाचे दोन व्हॉल्व्ह दुरुस्त करणे. तसेच १०० मि. मी. व्यासाचा एअर व्हॉल्व्ह दुरुस्त करणे. व ५०० मी. मी. व्यासाच्या पाइपलाइनवर लिकेज काढणे, ही कामे करण्यात येणार आहेत. 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्षेप , सुदर्शन घुले चक्कर येऊन खाली पडला ; कोर्टात काय घडलं ?

नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. २१ मध्ये मुक्तीधाम जलकुंभाजवळील कुलकर्णी पंपाची ३०० मि. मी. व्यासाच्या एम. एस. पाइपलाइनला मोठ्या प्रमाणात गळती असल्याने दुरूस्ती करणे, ६०० मि. मी. व्यासाच्या पाइपलाइनवरील फ्लोमीटरची गळती दुरुस्त करणे, स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत प्रभाग क्र. २१ मध्ये मुक्तीधाम जलकुंभाजवळील कुलकर्णी पंपाची ३०० मि. मी. व्यासाच्या इनलेट लाइनवर व्हॉल्व्ह बसविणे. प्रभाग क्र. २१ मध्ये दुर्गा जलकुंभ येथील स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत इनलेट व आऊटलेट लाइनवर व्हॉल्व्ह बसविणे तसेच फ्लोमीटर बसविणे. 

पंचवटी विभागात पेठरोड सप्तरंग सोसायटीजवळ मखमलाबाद ६०० मि.मी. व्यासाच्या उर्ध्ववाहिनीवर अमृतगार्डन, तवली डोगरला जाणाऱ्या उर्ध्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शन करणे. पंचवटी जलशुध्दिकरण आवारातील नवीन १५ लक्ष लीटर क्षमतेच्या जलकुंभांच्या मुख्य वितरण वाहिनीवर आर. पी. जलकुंभाच्या उर्ध्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शन करणे. निलगिरी बाग जलशुध्दिकरण आवारातील २० लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभच्या मुख्य वितरण वाहिनीवर कैलासनगर, संभाजीनगर रोड, गंगापूर डावा तट कालवा परिसरास पाणी पुरवठा सुधारणा करणेकामी ३०० मि. मी. व्यासाच्या मुख्य वितरण वाहिनीचे क्रॉस कनेक्शन करणे.

 तसेच सातपूर विभागात अंबडलिंक रोड म्हसोबा मंदीरमागे ले रिगालिया बिल्डिंग रस्ता येथील ५०० मि. मी. व्यासाची पाइपलाइन टाकणे, चुंचाळे शिवार मारुती संकुल ते घरकुल रस्ता ४००. मि. मी. व्यासाच्या पाइपलाइनचे लिकेज काढणे. पिंपळगाव बाहुला शारातील खांडकी रस्ता १००० मि. मी. व्यासाच्या पाइपलाइनचे लिकेज काढणे प्र. क्र. ८ कॅनॉल रस्ता संत कवीरनगर ५०० मि. मी. पीएससी लाइनचे लिकेज काढणे, गणेशनगर जलकुंभाजवळ ५०० मि. मी. पीएससी लाइनचे लिकेज काढणे. प्र. क्र. ९ ध्रुवनगर गुलमोहर कॉलनी १,२०० मि. मी. पीएससी लाइनचे लिकेज काढणे, कार्बन नाका संदीप क्लासिक कंपनी भिंतीलगत ५०० मि. मी. पीएससी लाइनचे लिकेज काढणे. भोसला मिलिटरीजवळील ५०० मि. मी. पीएससी लाइनचे व्हॉश आऊट व व्हॉल लिकेज बंद करणे. अमृतमणी जलकुंभ येथील इनलेट व्हॉल स्मार्ट सिटी कंपनी बसविणे. दत्त नगर पाण्याची टाकी येथे इनलेट व्हॉल्व्ह बसविणे, चुंचाळे पम्पिंग इनलेट, आऊटलेट दोन्ही व्हॉल्व्ह बसविणे, नाईक पाण्याची टाकी येथील इनलेट व्हॉल्व्ह बसविणे. 

सिडकोत ९०० मि. मी. व्यासाचे पाइप लाइन लिकेज काढणे, अंबड इएसआर ७०० मि. मी. व्हॉल्व्ह रिपेअरिंग करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा उद्या शनिवारी पूर्ण दिवस बंद राहणार आहे तर रविवारी सकाळी दाबाने तर सायंकाळी पूर्ववत होईल असे नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group