सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्षेप , सुदर्शन घुले चक्कर येऊन खाली पडला ; कोर्टात काय घडलं ?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्षेप , सुदर्शन घुले चक्कर येऊन खाली पडला ; कोर्टात काय घडलं ?
img
वैष्णवी सांगळे
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष उलटून गेले आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि इतरांविरोधात आज कोर्टात आरोप निश्चितीची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत मोठी घडामोड झाली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांच्यावरच आक्षेप घेण्यात आला.

वाल्मीक कराड आणि विष्णु चाटे वगळता इतर आरोपींनी सरकारी वकील उज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्यांना यातून बाजूला करावे असा अर्ज न्यायालयाला दिला. सरकारी वकील उज्वल निकम यांच्याबाबत दिलेल्या अर्जाबाबत न्यायाधीशांनी निकम यांना कल्पना दिली. त्यानंतर निकम यांनी आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडत हा अर्ज रिजेक्ट करण्याची मागणी केली.

भारत-बांगलादेश वाद उफाळणार ? उस्मान हादीच्या मारेकऱ्यांना भारतातून फरफटत आणा, नाहीतर…इंकलाब मंचाची मोठी धमकी

दरम्यान, न्यायाधीशांनी आरोपी घुलेचे नाव पुकारताच आरोपी सुदर्शन घुले चक्कर येऊन खाली पडला. घटनेदरम्यानचे व्हिडिओ आरोपी वकिलांना देण्यात यावे मग आरोप निश्चिती केली जावी असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला आहे. जे व्हिडीओ ट्रायल कोर्टात नाही ते व्हिडिओ उच्च न्यायालयात दाखवले जातात आणि वातावरण भावनिक केले जाते. सरकारी पक्षाकडून आजच आरोपीच्या वकिलांना व्हिडिओज फाइल दिले जाणार असल्याची माहिती आहे.

अर्धा तास लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हमधील व्हिडीओबाबत युक्तिवाद पार पडला. आवादा कंपनीचे अधिकारी यांनी मोबाईलमधून डेटा लॅपटॉपमध्ये कॉपी केला आणि मोबाईलमधील सर्व डेटा डिलिट केला असे म्हणणे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर मांडले. अद्याप आरोप निश्चिती झालेली नाही.

तर आरोपी क्रमांक २ विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला आहे. विष्णू चाटे याचे सुरवातीच्या दोन एफआयआर (FIR)मध्ये नाव नाही तसेच त्यांच्यावर या पूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचा युक्तिवाद चाटेच्या वकिलांनी केला. विष्णु चाटेकडून वारंवार आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी करण्यात आली, असल्याचा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वकिलांनी केला आहे. विष्णु चाटे सुरूवातीपासून गुन्ह्यात सक्रिय आहे, असंही सरकारी पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group