बांगलादेशामध्ये गेल्या वर्षी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात हिंसक आंदोलन झाले. त्यात विरोधी नेता उस्मान हादी याचा सिंहाचा वाटा होता. १८ डिसेंबर 2025 रोजी सिंगापूरमध्ये गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली. गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याचा मृत्यू ओढावला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार गेल्यावर्षी उलथवण्यात आले. विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थी नेत्याचा त्यासाठी वापर करण्यात आला. यामध्ये शरीफ उस्मान हादी हा सर्वात पुढे होता.जुलै महिन्यात त्याने बंड पुकारले होते.
ऑगस्ट महिन्यात शेख हसीना यांना जीव वाचवत भारतात आश्रय घ्यावा लागला होता. सिंगापूरमध्ये 18 डिसेंबर 2025 रोजी उस्मान हादीवर जवळून गोळीबार करण्यात आला. त्याची प्राणज्योत मालवली. तेव्हापासून बांगलादेशमध्ये जाळपोळ सुरू आहे. देशभरात हिंसेचे लोण पसरले आहे. इंकबाल मंचाने आता भारतातून शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये आणून शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ही हत्या शेख हसीना यांच्या इशाऱ्यावरून करण्यात आल्याचा इंकबाल मंचाचा आरोप आहे. शेख हसीना यांना लवकर अटक करून देशात आणले नाहीतर देश ठप्प करण्याचा इशारा मंचाने दिला आहे. या घटनेमुळे भारत-बांगलादेश सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता आहे.
गुरुवारी इंकलाब मंचाने फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार जर शरीफ उस्मान हादी हे शहीद झाले आहेत. त्यांनी देशासाठी जीव दिला. त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर भारतातून आणा. देशाची एकजुटता आणि सार्वभौमत्वासाठी आता निकराचा लढा देण्याची वेळ आली आहे. जर लवकर कार्यवाही झाली नाही तर शाहबाग येथे आंदोलन करण्यात येईल. आंदोलनाचे लोण देशभर पसरेल आणि बांगलादेश ठप्प होईल हे लक्षात ठेवा असा सज्जड दम इंकबाल मंचाने युनूस सरकारला दिला आहे