मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री देशाला संबोधित करणार
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री देशाला संबोधित करणार
img
Dipali Ghadwaje
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई करत पाकिस्तानमधील तब्बल 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत बदला घेतला होता. ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले केले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारतातील 15 शहरांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आले होते मात्र भारताने आपल्या एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले.

तर आता दोन्ही देशात वाढलेला तणाव कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री (12 मे) देशाला संबोधित करणार आहे. आज रात्री पंतप्रधान मोदी नेमकं काय? बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे . 
भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी पाकिस्तानकडून हल्ले करण्यात येत आहे. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी देशाला काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group