केंद्र सरकारकडून इंधन बचत आणि स्वदेशी वस्तूंच्या वापरावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना अनावश्यक इंधन वापर टाळण्याचे आणि खर्चात काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान,आता राज्य सरकानेही काही महत्वाचे नियम लागू केले आहेत. नुकतचं राज्य प्रशासनाकडून यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
राज्य शासनाच्या परिपत्रकातील सूचना खालील प्रमाणे
> शासकीय अधिकाऱ्यांचे मंजूर परदेश दौरे रद्द करण्यात आले असून नवीन दौऱ्यांचे नियोजन करू नये.
> अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शक्य तिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा ‘कारपूलिंग’चा वापर करावा.
> दैनंदिन वापरासाठी भाड्याने घेण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावे.
> कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दिवे, पंखे, संगणक आणि एसी बंद करावेत.
> वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस मेट्रो, लोकल किंवा बसने प्रवास करावा.
> .सर्व शासकीय बैठका, प्रशिक्षण आणि चर्चासत्रे शक्यतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) किंवा ऑनलाइन पद्धतीने घ्यावीत.
> पुढील ६ महिन्यांसाठी कोणत्याही नवीन सल्लागारांची नेमणूक करण्यात येऊ नये.
> वातानुकूलित यंत्रणेचे (AC) तापमान २४-२६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान ठेवावे.
> इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग केंद्रांच्या प्रस्तावांना तातडीने मान्यता द्यावी.
> ‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरांवर सौरऊर्जा संच बसवण्यावर भर द्यावा.
> होर्डिंग्जसाठी डीजी सेटचा वापर करू नये आणि अनावश्यक सजावटीचे दिवे टाळावेत.
> पोलीस विभागाने दुचाकी रॅली किंवा वाहनांच्या मिरवणुकींना परवानगी देऊ नये.
> कॅन्टीन आणि वसतिगृहांनी खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी मेनूमध्ये बदल करावेत.
>नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊन रासायनिक खतांचा वापर कमी करावा.
> मुंबई आणि मोठ्या शहरांतील हॉटेल-रेस्टॉरंटनी पीएनजी (PNG) वापरावा यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.
> फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग्जवरील अनावश्यक खर्च टाळून तेथील डेकोरेटिव्ह लायटिंगवर बंदी