पंतप्रधानांना पुन्हा भेटले राजनाथ सिंह;
पंतप्रधानांना पुन्हा भेटले राजनाथ सिंह; "या" बड्या अधिकाऱ्याच्या हजेरीने चर्चांना उधाण
img
Dipali Ghadwaje
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून संतापाची लाट उसळली आहे. भारताने तर या हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानचा दाणापाणी बंद केला आहे.

त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारताने प्लान आखायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

पंतप्रधानांच्या 7 लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला अति महत्त्वाचे अधिरकाही उपस्थित होते. त्यामुळे बैठकीत मोठी रणनीती ठरल्याचं बोललं जात आहे.

आज सकाळीच राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवास गाठलं. यावेळी त्यांच्यासोबत तीन सैन्याचे प्रमुख सीडीएस अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते. रात्रीच्या बैठकीला फक्त राजनाथ सिंह उपस्थित होते. आता दोन्ही प्रमुख अधिकारी उपस्थित राहिले.

यावेळी त्यांची मोदींसोबत 40 मिनिटे चर्चाा झाली. या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पण राजनाथ सिंह दोनदा पंतप्रधानांना भेटले आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही मोदींना भेटल्याने अनेक तर्कवितर्क लगावले जात आहेत.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group