लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
या चित्रपटाने जगभरात कमाईचा 700 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इतकंच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ‘छावा’चं कौतुक केलं होतं. आता ते विकी कौशलच्या या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये सहभागी होणार आहेत.
संसदेत ‘छावा’च्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं जाणार आहे. संसदेच्या लायब्ररी इमारतीच्या बालयोगी ऑडिटोरियममध्ये विकी कौशलचा हा चित्रपट दाखवला जाईल.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच केंदीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे इतर मंत्री, खासदारसुद्धा उपस्थित राहणार आहेत.
संसदेकडून आयोजित केलेल्या या स्पेशल स्क्रिनिंगला अभिनेता विकी कौशल, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजनसुद्धा उपस्थित राहणार आहेत.