'आजचा दिवस अद्भुत'... नौदलासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आयएनएस विक्रांतवर
'आजचा दिवस अद्भुत'... नौदलासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आयएनएस विक्रांतवर
img
वैष्णवी सांगळे
भारतात दिवाळीचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नौदलासोबत दिवाळी साजरी केली. गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावर आयएनएस विक्रांतवरील शूर सशस्त्र दलाच्या जवानांसोबत पंतप्रधानांनी दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या शौर्याचे कौतुक केले. 


"काही महिन्यांपूर्वीच, आपण पाहिले की INS विक्रांत या नावाने पाकिस्तानची झोप उडवली होती. त्याचे सामर्थ्य इतके आहे की युद्ध सुरू होण्यापूर्वीच शत्रूचे मनोबल कमी होते. ही आयएनएस विक्रांतची शक्ती आहे... या प्रसंगी, मी आपल्या सशस्त्र दलांना विशेष सलाम करू इच्छितो," असे पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले.

"दिवाळीच्या सणात प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावीशी वाटते. मलाही माझ्या कुटुंबातील सदस्यांसोबत दिवाळी साजरी करण्याची सवय झाली आहे. म्हणूनच मी तुमच्यासोबत, म्हणजेच जे माझे कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला आलो आहे. मीही ही दिवाळी माझ्या कुटुंबातील सदस्यांसोबत साजरी करत आहे," असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, "आजचा दिवस अद्भुत आहे. हा क्षण संस्मरणीय आहे. आज माझ्या एका बाजूला विशाल समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या शूर सैनिकांची अफाट ताकद आहे. आयएनएस विक्रांतवर काल रात्री वेळ खूप चांगला गेला. तो अनुभव शब्दात वर्णन करणे कठीण आहे. मी पाहिले की तुम्ही उत्साह आणि आनंदाने भरलेले होतात. तुम्ही गाणी गायलीत. तुम्ही तुमच्या गाण्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरचे ज्या प्रकारे वर्णन केलेत, ते खूपच अद्भूत  होते. युद्धभूमीवर उभा असलेला सैनिक ज्या भावना व्यक्त करू शकतो, तशा भावना इतर कोणीही व्यक्त करू शकणार नाही."
इतर बातम्या
Join Whatsapp Group