पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला संदेश
img
दैनिक भ्रमर
 आज (7 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा संदेश मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला आहे. यावेळी केवळ संदेशच नाही तर हत्येची योजना आखणाऱ्या व्यक्तीचा फोन नंबरही पाठवण्यात आला होता. मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीने मुंबई आणि धनबाद येथे बॉम्बस्फोट बॉम्बस्फोट घडवून आणला जात असल्याचे म्हटले आहे. या धमकीनंतर आता पोलिस अर्लट मोडवर आले असून याप्रकरणी चौकशी सुरु आहे.

नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा संदेश वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाला.शनिवारी पहाटे हा संदेश पाठवण्यात आला. या संदेशात संशयित व्यक्तीचे नाव आणि नंबर देखील पाठवण्यात आला. यासोबत काही आरोपही करण्यात आली आहेत. प्रिन्स आणि इफान अशा दोन संशयित व्यक्तींच्या नावाचा उल्लेख त्या संदेशात करण्यात आलाय.

पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा संदेश मिळाल्यानंतर मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाने मुंबई पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी आता पोलिसांकडून तपास केला जातोय.

याप्रकरणी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांना शनिवारी मिळाली. बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून ही हत्या केली जाऊ शकते, असा मेसेज पाठवण्यात आला. या मेसेजमध्ये पाकिस्तानच्या आयएसआयचे एजंट असल्याचा दावा करणाऱ्या दोन व्यक्तींची नावे आहेत.

दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी मुंबई पोलिसांना मिळाल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात एका महिलेने दूरध्वनी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची तयारी सुरू असून त्यांच्याकडे शस्त्र असल्याचे सांगितले होते. त्यानंतर महिलेने दूरध्वनी बंद केला. तपासणीत तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे स्पष्ट झाले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group