भारत-अमेरिका व्यापार करारानंतर काय स्वस्त होणार?  जाणून घ्या
भारत-अमेरिका व्यापार करारानंतर काय स्वस्त होणार? जाणून घ्या
img
वैष्णवी सांगळे
डोनाल्ड ट्रम्प यांनी काल त्यांच्या ट्रथ सोशल या प्लॅटफॉर्मवरुन भारत आणि अमेरिकेची या दोन्ही देशांची व्यापार करारावर सहमती झाल्याची घोषणा केली. दोन्ही देशातील व्यापार करार दोन्ही देशांच्या संबंधासाठी एक निर्णायक पाऊल मानलं जात आहे. अमेरिकेने भारतावर लादलेले २५ टक्के टॅरिफ १८ टक्क्यांवर आणले आहे.

एनडीटीव्ही प्रॉफिट रिसर्चच्या रिपोर्टनुसार व्यापार करारामुळं अमेरिकन वस्तूंच्या भारतातील दरात घसरण होईल. आयात शुल्क कमी झाल्यानं त्याच्या किमतीवर परिणाम होईल. कृषी क्षेत्रातील डाळी, डेअरी उत्पादनं आणि प्रक्रिया केलेलं अन्न याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात देखील याचा परिणाम दिसून येईल. लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक गॅजेटस आणि कम्पोनेंटस या सारख्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी झाल्यानं त्याच्या दरात देखील घसरण होईल. पॅकेज्ड फूड, होम अप्लायन्सेस सारख्या वस्तूंच्या दरात घसरण होईल. 

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारामुळं भारतीय निर्यातदारांना देखील फायदा होणार आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राला अमेरिकेनं टॅरिफ घटवल्याचा फायदा होईल. दागिने क्षेत्रात स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते भारताची निर्यात क्षमता आणखी मजबूत होण्यास अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराचा फायदा होणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group