अमेरिकेलाही जमलं  नाही ! भारताच्या मध्यस्थीने युद्ध थांबणार? जगाचं लक्ष भारताकडे
अमेरिकेलाही जमलं नाही ! भारताच्या मध्यस्थीने युद्ध थांबणार? जगाचं लक्ष भारताकडे
img
Nandini khandare More
गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचा शेवट कधी होणार, हा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसह अनेक देशांकडून प्रयत्न करण्यात आले, मात्र अद्याप निर्णायक तोडगा निघालेला नाही. अशातच आता भारताने या युद्धाच्या तोडग्यासाठी सक्रिय पाऊल उचललं आहे. भारताच्या प्रस्तावाला युक्रेनकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने युद्धविरामाच्या आशा पुन्हा एकदा निर्माण झाल्या आहेत. नेमका भारताचा प्रस्ताव काय आहे आणि रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारताची भूमिका किती महत्त्वाची ठरणार आहे?

 रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. रशियाने युक्रेनसोबतचं युद्ध थांबवलं नाही म्हणून ट्रम्प यांनी रशियावर आर्थिक निर्बंध देखील लादले होते, परंतु त्यात देखील त्यांना यश आलं नाही. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे जे अमेरिकेला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं आहे.
भारताकडून युक्रेन आणि रशियाला युद्ध थांबवण्यासाठी सिझफायरचा एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, त्यामुळे आता लवकरच हे युद्ध थांबण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव यांनी बुधवारी सांगितलं की, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी भारत जे योगदान देत आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. तर दुसरीकडे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील भारताने पाठवलेल्या या युद्धबंदीच्या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे, आमच्याकडे युद्धबंदीचे चार प्रस्ताव आले आहेत, मात्र त्यातील सर्वात योग्य आणि व्यापक प्रस्ताव आम्हाला भारताचा वाटत असल्याचं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.

भारताच्या प्रस्तावामध्ये काय आहे?

भारताने रशिया आणि युक्रेनला दिलेला सिझफायरचा प्रस्ताव हा संवेदनशील आर्थिक मुद्द्यांवर केंद्रीय आहेत. भारताकडून रशिया आणि युक्रेनला युद्ध थांबवण्यासाठी तीन सुत्रीय कार्यक्रम देण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही देशांकडून या प्रस्तावाचं स्वागत करण्यात आलं असून, रशिया आणि युक्रेनने भारताच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे आता हे युद्ध लवकरच थांबण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group