गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. या युद्धात मोठमोठे हल्ले केले जात आहेत. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून संयुक्तपणे इराणवर हल्ले करत आहे. यादरम्यान अमेरिकेने इराणच्या महत्वाच्या बेटावर हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निष्ठावंत आणि कट्टर समर्थक लॉरा लूमर यांनी नुकताच मोठे विधान भारताबद्दल केले. त्यांनी म्हटले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना भारतावर प्रेम आहे, ते पंतप्रधान मोदींवर प्रेम करतात.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकारी लॉरा लूमर यांनी मोठं भाष्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी एक खास संदेश पाठवला असल्याचं लॉरा लूमर यांनी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये बोलताना म्हटलं आहे. यावेळी लॉरा लूमर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा एक खास संदेश वाचून दाखवला.
लॉरा लूमर यांनी म्हटलं की, मी आताच एका तासापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलले. तेव्हा ट्रम्प यांनी मला सांगितलं की माझा भारतासाठी संदेश आहे. ट्रम्प म्हणाले की, ‘आय लव्ह इंडिया, लव्ह मोदी. मला भारतीय लोक आवडतात. पंतप्रधान मोदी एक उत्तम नेते आणि माझे चांगले मित्र आहेत. कृपया भारतातील लोकांना सांगा की मी लवकरच पुन्हा एकदा भारतात येईन’, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं असल्याचं लॉरा लूमर यांनी सांगितलं आहे.
भारत आणि अमेरिकेत आता आणखी एक मोठा व्यापार करार लवकरच होणार असल्याचे संकेत अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी दिले आहेत. राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटलं की, भारत आणि अमेरिका एका मोठ्या खनिज व्यापार कराराची तयारी करत आहेत.