जगाचं टेंशन वाढणार ? ट्रम्प यांची इराणला जाहीर शिवीगाळ करत धमकी, इराणचीही मग जगाला धडकी भरवणारी धमकी
जगाचं टेंशन वाढणार ? ट्रम्प यांची इराणला जाहीर शिवीगाळ करत धमकी, इराणचीही मग जगाला धडकी भरवणारी धमकी
img
वैष्णवी सांगळे
अमेरिका इराण युद्धाचा शेवट कधी होईल याची सर्व जग आतुरतेने वाट पाहत आहे. त्यातच भांडखोर डोनाल्ड ट्रम्प सोयीनुसार युद्ध चालू बंद ठेवत आहे. युद्ध थांबवण्यासाठी इराणदेखील ३ अटी ठेवल्या आहेत. हे सर्व सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी सीमा पार केलीय. ट्रम्प यांनी इराणला थेट 'हरामखोर' म्हटले आणि होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही तर मोठ्या हल्ल्याची धमकी दिली. 

ते म्हणाले की, जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही, तर इराणचे नरकात रूपांतर करतील. त्यांनी इराणमधील वीज प्रकल्प आणि पुलांवर हल्ला करण्याबद्दलही भाष्य केले. ट्रम्प यांनी रविवारी सोशल मीडियावर लिहिले की, मंगळवार हा इराणमध्ये 'वीज प्रकल्प दिन' आणि 'पूल दिन' असेल, म्हणजेच हल्ला होईल. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी उघडली पाहिजे, अन्यथा तेथे नरकासारखी परिस्थिती निर्माण होईल.

इराणने ट्रम्प यांचा अल्टिमेटम फेटाळला असून, त्याला युद्धगुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी चिथावणी म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई म्हणाले की, ट्रम्प यांच्या धमक्या गुन्हेगारी मानसिकता दर्शवतात आणि त्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहेत. ते म्हणाले की, अशी विधाने युद्धगुन्हे आणि मानवतेविरुद्धचे गुन्हे आहेत. ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे आणि तसे न केल्यास गंभीर लष्करी कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

जर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले वाढले, तर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत करण्याची धमकी इराणने दिली आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, इराणने म्हटले आहे की ते होर्मुझच्या सामुद्रधुनीव्यतिरिक्त इतर सागरी मार्गांनाही लक्ष्य करू शकते. इराणच्या सर्वोच्च नेत्याचे सल्लागार अली अकबर वेलायती यांनी म्हटले आहे की, कोणत्याही मोठ्या कारवाईला केवळ लष्करीच नव्हे, तर जागतिक ऊर्जा आणि व्यापारावर परिणाम करूनही प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांनी म्हटले आहे की केवळ होर्मुझची सामुद्रधुनीच नव्हे, तर बाब-अल-मंदेबसारखे महत्त्वाचे सागरी मार्गही धोक्यात येऊ शकतात. हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा ट्रम्प यांनी इराणला शिवीगाळ करत होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे आणि कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. यापूर्वी, इराण समर्थित हौथी बंडखोरांनी लाल समुद्रातील जहाजांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती.

इराणची राजधानी तेहरानमध्ये झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात चार जण ठार आणि सात जण जखमी झाले. हा हल्ला पूर्व तेहरानच्या एका निवासी भागात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात तीन निवासी इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या, तर अंदाजे 50 इमारतींचे मोठे नुकसान झाले. बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी, फार्स आणि तस्नीम वृत्तसंस्थांनी दावा केला होता की, तेहरानच्या बहारेस्तान भागात झालेल्या दुसऱ्या एका हल्ल्यात किमान 13 जण ठार झाले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group