इराणला मोठा धक्का ! अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
इराणला मोठा धक्का ! अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाला सव्वा महिना लोटत आला आहे. या सव्वा महिन्याच्या काळात इराणनेअमेरिका आणि इस्राइलच्या आक्रमक कारवाईला इराणकडून जोरदार आव्हान दिले जात आहे. मात्र या भीषण संघर्षात इराणच्या अनेक बड्या नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात आता आयआरजीसीच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी हे अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यात मारले गेले आहेत. आयआरजीसीने त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आयआरजीसीने आज सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात खादेमी ठार झाल्याची घोषणा केली आहे. आयआरजीसी ही इराणच्या सर्वात शक्तिशाली सुरक्षा संस्थांपैकी एक असून, परकीय प्रभावाला तोंड देण्यासाठी देशांतर्गत पाळत ठेवण्यात तिची मध्यवर्ती भूमिका आहे आणि ती अनेकदा नागरी गुप्तचर मंत्रालयाच्या समांतर काम करते.  या हल्ल्याबाबत इस्रायलकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. खादेमी यांच्या मृत्यूमुळे, सरकारी माध्यमांद्वारे वृत्त दिल्या जाणाऱ्या संवेदनशील आणि बारकाईने पाहिल्या जाणाऱ्या घटनांच्या मालिकेत आणखी एका घटनेची भर पडली आहे.

इराण आणि अमेरिकेला शत्रुत्व संपवण्याच्या उद्देशाने एक प्रस्तावित आराखडा प्राप्त झाला असतानाच हा अहवाल समोर आला आहे, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका सूत्राच्या हवाल्याने रॉयटर्सने वृत्त दिले आहे. हा प्रस्ताव सोमवारपासूनच लागू होऊ शकतो आणि महत्त्वाचा जागतिक ऊर्जा वाहतूक मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडू शकते.

माजीद खादेमी कोण?
मजीद खादमी यांच्या मृत्यूमुळे इराणमध्ये खळबळ उडाली आहे. खादमी यांची 2022 मध्ये इराणच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वीचे गुप्तचर प्रमुख मोहम्मद काझमी आणि त्यांचे डेप्युटी हसन मोहाकिक हे दोघेही इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेले होते. तसेच इराणचे आणखी एक वरिष्ठ लष्करी कमांडर मोहसेन बघेरी यांचाही मृत्यू झाला होता. या सर्व घटनांनंतर इराणची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी खादमी यांच्याकडे गुप्तचर विभागाचे नेतृत्व देण्यात आले होते. पदभार स्वीकारल्यानंतर खादमी यांनी गुप्तचर यंत्रणेत अनेक सुधारणा केल्या आणि ते अनेक महत्त्वाच्या गुप्तहेर कारवायांमध्ये सहभागी झाले होते. ते पूर्वी इराणच्या संरक्षण मंत्रालयातील गुप्तचर सुरक्षा संघटनेचे प्रमुख म्हणूनही कार्यरत होते, जिथे त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांचे नियोजन केले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मेजर जनरल मजीद खादमी हे इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे जवळचे आणि विश्वासू अधिकारी होते. खादमी यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षा आणि गुप्तचर ऑपरेशन्सचा मोठा अनुभव होता, त्यामुळेच त्यांना प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता खादमी यांचा मृत्यू इराणसाठी मोठे नुकसान मानले जात आहे. कारण मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण असताना इराणची सुरक्षा व्यवस्था काही प्रमाणात कमकुवत होऊ शकते. यामुळे या युद्धात अमेरिका आणि इस्रायलला आघाडी घेण्याची संधी मिळू शकते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group