अमेरिका-इराण युद्धजन्य परिस्थितीचा बाजारपेठेला फटका; सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण!
अमेरिका-इराण युद्धजन्य परिस्थितीचा बाजारपेठेला फटका; सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण!
img
नितीशा कुलकर्णी





अमेरिका-इराण युद्धाचा परीणाम हा जिवनावश्य वस्तुंवर होत आहे. आता युद्धाचा परिणाम सोनं-चांदिच्या भावार देखील होत आहे. मात्र अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेच्या दुसऱ्या फेरीची योजनाही अयशस्वी ठरली. युद्धविनरामाची मुदत संपण्याच्या काही तास आधीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवली. पण दोन्ही देशांतील शांतता चर्चेबाबत अजूनही काही निश्चितता नाही. त्यासंदर्भात कोणतीही प्रगती होत नसल्याने युद्ध पुन्हा सुरू होणार का? अशी भीती सर्वांच्या मनात आहे.

प्रगतीचा अभाव अनिश्चित वाढवत राहिला असून ज्यामुळे कच्च्या तेलाला आणि डॉलरला आधार मिळाला, मात्र दुसरीकडे मौल्यवान धातूंना याचा फटका बसला. सोन्या-चांदीच्या किमतींवर परिणाम झाल्याचे दिसून आलं. देशात सोन्याच्या दरात आणखी घसरण झाली आहे. आज, 23 एप्रिलच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,54,890 रुपयांपर्यंत घसरला.

मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1,54,740 रुपये इतका खाली आली. तर आदल्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 300 ​​रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम र 1,57,000 रुपयांवर आला होता. तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,742.97 डॉलर इतका आहे.

दिल्लीतील सोन्याचा भाव: दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,54, 890 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 1, 41, 990 रुपये मोजावे लागतील.

मुंबई आणि कोलकाता दर: सध्या मुंबई आणि कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,41,840 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,54,740 रुपये आहे.

चेन्नईमध्ये सोन्याचा भाव: 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 55 हजार 450 रुपये इतका आहे. 22 कॅरेट सोन्याची 10 ग्रॅमची किंमत ही 1 लाख 42 हजार 490 रुपये आहे.

पुणे आणि बंगळूरुमधील दर: ​​या दोन्ही शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,54,740 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,41,840 रुपये आहे. चांदीच्या किमती किती ? सोन्याप्रमाणेच चांदी या दुसऱ्या मौल्यवान धातूच्या किमतीतही घट होताना दिसली आहे.

23 एप्रिलच्या सकाळी, चांदीची किंमत घसरून प्रति किलोग्राम 2,64,900 रुपये झाली. आदल्या दिवशी, दिल्ली सराफा बाजारात चांदीची किंमत 2700 रुपयांनी ने घसरून प्रति किलोग्राम 2.55 लाख झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा व्यवहार प्रति औंस 77.80 डॉलर दराने होत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group