कोणत्याही परिस्थितीत इराण सोडा , भारतीय दूतावासाचा भारतीय नागरिकांना इशारा
कोणत्याही परिस्थितीत इराण सोडा , भारतीय दूतावासाचा भारतीय नागरिकांना इशारा
img
वैष्णवी सांगळे
इराण-अमेरिका यांच्यातील संघर्ष आता स्फोटक वळणावर आल्याची स्थिती झाली आहे. इराणच्या अणवस्त्र आणि बॅलेस्टिक मिसाईल कार्यक्रमावरुन मागच्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत चर्चा सुरु आहेत. पण यावर अजूनपर्यंत कुठलाही तोडगा दृष्टीपथात आलेला नाही. फक्त सकारात्मक चर्चा झाली असं इराणकडून सांगितलं गेलय. आता इराण-अमेरिका तणाव प्रचंड वाढला आहे. कुठल्याही क्षणी युद्धाची शक्यता दिसू लागली आहे. त्यामुळे भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना इराण सोडण्याचं आवाहन केलय. 

भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना ओळखपत्रांचे पुरावे तयार ठेवण्यास सांगितले असून दूतावासाच्या संपर्कात रहाण्यास सांगितलं आहे. ज्या भारतीयांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यांना दूतावासाच्या अधिकृत लिंकवरुन रजिस्ट्रेशन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिच्या दोन शक्तीशाली विमानावाहू युद्धनौका अब्राहम लिंक आणि गेराल्ड फोर्ड या इराण जवळच्या समुद्रात तैनात आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group