इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. युद्धात अनेक देश होरपळत असले तरी युद्ध कधी बंद होईल हे कोणासही ठाऊक नाही. अमेरिका वारंवार कडक शब्दांत इराणला इशारा देत आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक घातक होत आहे. जगाकडून युद्ध थांबवण्याची मागणी होत आहे, पण युद्ध भीषण स्थितीत आहे.
इराणमधील ऊर्जा प्रकल्प आणि ब्रिजला टार्गेट करून मोठे हल्ले होणार आहेत. तसा इशाराही अमेरिकेने दिला. हल्ल्याची वेळ, तारीख सर्वकाही अमेरिकेने सांगितले. काही तासात इराणमध्ये विनाशाला सुरूवात होईल. मंगळवारी रात्री 8 वाजता अमेरिकेकडून इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर आणि ब्रिजवर हल्ले होतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: हल्ल्याची तारीख वेळ सर्वकाही सांगितले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, मंगळावारी रात्री 8 वाजता इराणवर हल्ले केले जातील. भारतीय वेळेनुसार, बुधवारी दुपारी 3.30 ला इराणवर हल्ला होईल. पूर्ण देश एका रात्रीत संपेल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांची ही पोस्ट रिशेअर करत झिम्बाब्वेच्या इराणी दूतावासाने म्हटले की, रात्री 8 वाजताची वेळ इतकी जास्त चांगली नाहीये.
तुम्ही ही वेळ बदलून दुपारी 1 ते 2 च्या आसपास किंवा शक्य असेल तर रात्री 1 ते 2 च्या आसपास करू शकता? या महत्वाच्या विषयावर लक्ष ठेवण्याबद्दल धन्यवाद… असेही त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार इराणला इशारा दिला जात आहे. मात्र, इराण कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद अमेरिकेला देत नसल्याचे दिसत आहे. उलट त्यांच्याकडून प्लॅन बी तयार करण्यात आला.