...तरच युद्ध थांबणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 अटी
...तरच युद्ध थांबणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 अटी
img
वैष्णवी सांगळे
28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ला चढवला, त्यात इराणचे सर्वोच्च नेते ठार झाले. त्यानंतर संतापलेल्या इराणने अमेरिका- इस्त्रायलवर मारा करत त्यांच्यावर हल्ला केला. १३ दिवसांपासून अविरत सुरू असलेल्या या युद्धाचा फटका फक्त ३ देशांनाच बसलेला नसून अख्ख्या जगावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. या संघर्षामुळे जागतिक शांतताही धोक्यात आली असून मध्य पूर्वेमध्ये इराणचे हल्ले सुरूच आहेत.  होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. 

याच दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. हे युद्ध रोखण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी ३ अटी ठेवल्या आहेत. अमेरिका आणि इस्रायलसोबतचा संघर्ष संपवण्याचा या तीन अटी एकमेव मार्ग आहेत. त्या मान्य झाल्या तरच हे युद्ध थांबेल असा इशारा इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दिला आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी राष्ट्रपती पेजेशकियान यांनी अटी मांडल्या. त्यांच्या देशाचे मूलभूत हक्क ओळखून भविष्यातील हल्ल्यांविरुद्ध ठोस हमी प्रदान करणे आवश्यक आहे असा आग्रह त्यांनी धरला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलेल्या एका निवेदनात, पेझेश्कियान यांनी हे युद्ध झिओनिस्ट राजवट आणि अमेरिकेने भडकवलेले युद्ध असल्याचे वर्णन केले.

तीन अटी कोणत्या ? 
१. भरपाईची रक्कम
२. तेहरानच्या कायदेशीर हक्कांची मान्यता
३. भविष्यातील कोणत्याही हल्ल्यांविरुद्ध आवश्यक आंतरराष्ट्रीय हमी. इराणवर भविष्यातपुन्हा कोणतेही आक्रमण होणार नाही, याची लिखित आणि ठोस आंतरराष्ट्रीय हमी द्यावी


इतर बातम्या
Join Whatsapp Group