इराण विरुद्ध सुरु केलेल्या युद्धात अमेरिकेने आपली शक्ती दाखवून दिली आहे. अमेरिकी सैन्याने इराणी नौदलाला पूर्णपणे उद्धवस्त केलं आहे. आतापर्यंत इराणी नौदलाची ९ जहाजं अमेरिकेने बुडवली आहेत. काही मोठी आणि महत्वाची जहाजं होती. अन्य जहाजांना लवकरच समु्द्राच्या तळाशी पाठवू असं ट्रम्प म्हणाले. इराणी नौदलाचं मुख्यालय सुद्धा मोठ्या प्रमाणात नष्ट केलय. हा हल्ला ऑपेरशन एपिक फ्युरीचा हिस्सा आहे. अमेरिकेच्या B2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर विमानांनी इराणच्या अंडरग्राऊड बॅलेस्टिक मिसाइल तळांवर 2000 पाऊंडचे बॉम्ब टाकले. हा हल्ला 1 मार्च 2026 रोजी झाला.
दरम्यान अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणसाठी ही सर्वात मोठी हानी असून इराण खामेंनीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मोठी तयारी करत आहे. संतापलेल्या इराणने आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात फतवाच जारी केला आहे.
इराणमधील पवित्र जामकरन मशिदीवर लाल ध्वज फडकवण्यात आला आहे. या मशिदीवर ध्वज फडकवणे हा शत्रूला थेट संदेश मानला जातो. शिया परंपरेत बदला घेण्यासाठी लाल ध्वज फडकवला जात असतो. इराणची ही पवित्र मशीद खास या ध्वजासाठी ओळखली जाते. आता इराणचे नागरिक, शिया मुस्लिम हे कोणत्याही मार्गाने हा बदला घेऊ शकतात याचे हे प्रतिक असल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तरित्या केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील त्यांची मुलगी, जावई, नातू ,सून सगळेच ठार झाले आहे. इराणचे अनेक नेते व लष्करी अधिकाऱ्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच सात दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे.