जग संकटात ! इराणचा जगाला झोप उडवणारा इशारा, थेट...
जग संकटात ! इराणचा जगाला झोप उडवणारा इशारा, थेट...
img
वैष्णवी सांगळे
अमेरिका,  इस्त्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जग संकटात सापडलं आहे. हे युद्ध कधी थांबणार याची सर्वच जण वाट पाहत आहे. या युद्धात अनेकांचे बळी गेले आहेत. जग आर्थिक संकटात आहे. जगभरात इंधन टंचाईस सुरुवात झाली आहे. पाकिस्तानमध्ये तर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात अली आहे. इराणकडून अमेरिकेवर दबाव आणण्याकरिता महत्वाचा समुद्री मार्गही बंद करण्यात आला. इराण हा होर्मुझच्या सामुद्रधुनीचा ताबा घेत आहे. ज्यामुळे आता थेट तेल आणि वायूच्या किंमती वाढल्या आहे. 

युद्धाच्या झळा : घरगुती गॅसचा अवैध वापर, महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल

तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या असतानाच इराण अजून मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. जर इराणकडून हा निर्णय घेण्यात आला तर जग मोठ्या संकटात सापडेल. एका वरिष्ठ इराणी लष्करी अधिकाऱ्याने स्पष्ट संकेत दिले की, अमेरिकेने धोरणात्मक चूक केली तर इराण सागरी ऑपरेशन्स दुसऱ्या महत्वाच्या जलमार्गांकडे वळवेल. अमेरिकेने चुकीचे पाऊल उचलले तर होर्मुजच्या सामुद्रधुनीत दुसरा संघर्ष निर्माण होऊ शकतो. 

बाब अल-मंडेबला इराणचे दुसरे होर्मुझ मानले जाते. इराणकडून जर तो समुद्री मार्ग बंद करण्यात आला तर जगाच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही. अंदाजे 26 किलोमीटर रुंदीचा हा जलमार्ग येमेन आणि जिबूती दरम्यान आहे. लाल समुद्राच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वारावर आहे. जर तो बंद झाला तर आखाती तेल उत्पादक देशांना तेल निर्यात करण्यासाठीचा शेवटाचाही मार्ग बंद होऊ शकतो.

...तरच युद्ध थांबणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 अटी

आता होर्मुजची सामुद्रधुनी बंद असल्याने बाब अल-मंदेब आखाती देशांसाठी आणखी महत्त्वाचा बनले आहे. सौदी अरेबिया सध्या लाल समुद्रातील बंदरे आणि पूर्व-पश्चिम पाइपलाइनद्वारे काही तेल निर्यात सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. बहुतेक तेल आशियाई बाजारपेठांसाठी निर्यात केले जाते आणि येमेनमधून जाते. जर खरोखरच इराणकडून हा समुद्रीमार्ग बंद करण्यात आला तर मोठी खळबळ उडेल. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group