मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
img
वैष्णवी सांगळे
इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर सध्या संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. मध्य पूर्वेतील तणाव दिवसागणिक वाढत असतानाच, त्याचा परिणाम जगभरातील प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. 

आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीनंतर अनेक देशांनी आपलं हवाई क्षेत्र बंद केलंय. तसेच, दुबई विमानतळही बंद करण्यात आलंय आणि अनेक उड्डाणं रद्द करण्यात आलीत. अशातच भारतातील अनेक प्रवासी आखाती देशांमध्ये अडकून पडलेत. दुबईत अडकलेल्या काही प्रवाशांना विमानानं मुंबई आणि बंगळुरूमध्ये आणण्यात आलं. पण, त्यासोबतच कुवेतमध्येही काही भारतीय अडकल्याची माहिती मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एक व्हिडीओ शेअर करुन दिली आहे.  

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा सध्या कुवेतमध्ये अडकला आहे. अभिनेत्रीचा मुलगा लंडनला निघाला होता. मुंबईवरुन निघालेलं त्याचं विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आलं. पण, आखाती देशांमध्ये वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व उड्डाणं रद्द करण्यात आलीत. अभिनेत्रीचा मुलगा चार दिवसांपासून कुवेतमधील एका हॉटेलमध्ये आहे.

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी रडत रडतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशाखा सुभेदार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये विशाखा सुभेदार यांनी आपल्या कुवेतमध्ये अडकलेल्या मुलाला भारतात सुखरुप आणण्याची विनंती पंतप्रधानांकडे केली आहे. 

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार म्हणाल्या की, "नमस्कार मी विशाखा सुभेदार... माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे... माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता. मात्र, कुवेतमध्ये त्याचं फ्लाईटमध्ये उतरवण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून तिथं एअर स्पेस नसल्यामुळे विमानं रद्द करण्यात आली आहेत. माझा मुलगा गेल्या चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकलाय. आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तिथे ड्रोन हल्ले होत आहेत. त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. भारतीयांना परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आमच्या मुलांची काळजी घ्यावी, ही विनंती सरकारला करतेय. लवकरात लवकर मार्ग काढावा..."
इतर बातम्या
Join Whatsapp Group