अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. अजूनही इराणच्या प्रमुख शहरांवर मिसाईल हल्ले सुरूच आहेत. चीन आणि रशियाकडून अमेरिकेने ज्या पद्धतीने इराणवर हल्ला केला त्याचा निषेध केला. बहरीनमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.
या युद्धाची झळ आता जगाला बसताना दिसत आहे. या युद्धाचे परिणाम थेट कच्च्या तेलांवर बघायला मिळतोय. या युद्धामध्ये इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली. सुरक्षेच्या कारणामुळे इराणकडून तो मार्ग बंद करण्यात आला. मात्र, याचा परिणाम जागतिक सागरी व्यापारावर होत आहे. इस्त्रायल, अमेरिका आणि इराणच्या युद्धात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. इराणकडून खाडी देशांवर क्षेपणास्त्र हल्ले केली जात आहेत. त्यामध्येच साैदी अरेबिया, ओमान, कतार, अबुधाबी, दुबई या देशांचा समावेश आहे.
कच्च्या तेलाच्या किंमती 72 डॉलर प्रति बॅरल इतक्या वाढल्या आहेत. 19 टक्क्यांनी ही वाढ झालीये. तेलाच्या बॅलरचा दर 80 डॉलरवर पोहोचला. जगभरातील इंधन तेलाच्या किंमती वाढण्याची भीती आहे. साैदी अरेबियाच्या गटात उत्पादनात इराणचा वाटा 12 टक्के इतका वाढला आहे.