अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डीलची घोषणा , दुसरीकडे रशियाची भारताला मोठी ऑफर
अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डीलची घोषणा , दुसरीकडे रशियाची भारताला मोठी ऑफर
img
वैष्णवी सांगळे
अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डीलची घोषणा झाली आहे, मात्र भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये अशी मागणी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. रशियाऐवजी भारताने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करावी, असे अमेरिकेचे मत आहे.  मात्र भारतानं आपली भूमिका स्पष्ट करत ज्या देशांवर प्रतिबंध आहे, अशा देशांकडून तेलाची खरेदी करणार नसल्याचे सांगितले आहे. 

अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डीलची घोषणा झाल्यानंतर अमेरिकेनं भारतावर भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला होता, तो टॅरिफ आता या ट्रेड डीलसोबतच हटवण्यात आला आहे. दरम्यान अमेरिकेनं टॅरिफ हटवण्याची घोषणा करताच आता रशियानं देखील भारतासाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. 

रशियानं पुन्हा एकदा भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये मोठी सूट देण्याची ऑफर दिली आहे, ज्याच्या माध्यमातून भारतामध्ये सुरू असलेला कच्च्या तेलाचा पुरवठा हा सुरळीत सुरू राहावा असा रशियाचा उद्देश आहे. सध्या मार्केटमध्ये कच्च्या तेलाचा प्रति बॅरेल जो रेट सुरू आहे, त्यापेक्षा प्रत्येक बॅरलवर 10 डॉलरपेक्षाही जास्त सूट देण्याची ऑफर रशियाकडून भारताला देण्यात आली आहे. 

बाजार विश्लेषकांच्या मते रशिया भारताला सध्या परिस्थितीमध्ये प्रति बॅरलवर 11 डॉलर इतकी सूट देऊ शकतो. गेल्या ऑक्टोबर महिन्यात कच्च्या तेलाच्या खरेदीवर भारताला जेवढी सूट मिळत होती, त्या पटीत ही सूट तीन पटीने वाढवण्यात आली आहे.

दरम्यान आता भारतासमोर असा मोठा प्रश्न असणार आहे की, एकीकडे अमेरिकेसोबतची डील फायनल झाली आहे, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाकडून तेलंखरेदिला विरोध बघता अशा परिस्थितीमध्ये आता भारत काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group