टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड, पाच सामन्यात झालं असं की...
टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड, पाच सामन्यात झालं असं की...
img
वैष्णवी सांगळे
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जोरदार सुरु आहे.  ८ व्या फेरीत दक्षिण अफ्रिकेने टीम इंडियाचा ७६ धावांनी पराभव केला. दक्षिण अफ्रिकने १८७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतिय संघाचा खेळ १११ धावांवरच संपुष्ठात आला.या पराभवासह भारताने एक लाजिरवाणा पराभवही आपल्या नावावर केला आहे. 

टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम रचला आहे. जागतिक क्रमवारीत नंबर 1 असलेल्या संघाचे फलंदाज 11 वेळा शून्यावर बाद झाले आहे. यात अभिषेक शर्माचं नाव आघाडीवर येत आहे. त्याला या स्पर्धेत तीन वेळा खातंही खोलता आलं नाही. अक्षर पटेल दोन वेळा शून्यावर बाद झाला. तर हार्दिक पांड्या, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, शिवम दुबे, इशान किशन आणि रिंकु सिंह प्रत्येकी 1 वेळा शून्यावर बाद झाले आहे.

इटलीचे फलंदाज 8 वेळा शून्यावर बाद झाले होते. तर ओमानचे फलंदाज 7 वेळा आणि पाकिस्तानचे 6 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. त्यामुळे या सर्वांना मागे टाकत भारतीय संघ आघाडीवर आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या तीन फलंदाजांना खातं खोलता आलं नाही. यात फॉर्मात असलेला इशान किशनचा नंबर पहिल्या स्थानावर आहे. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. इशान किशननंतर रिंकु सिंह आणि जसप्रीत बुमराह हे देखील शून्यावर बाद झाले. त्यामुळे भारताचा डाव 111 धावांवर आटोपला.



इतर बातम्या
Join Whatsapp Group