टॅरिफ वॉर : आता बस्स... भारताकडून अमेरिकेला जशास तसं उत्तर मिळणार !
टॅरिफ वॉर : आता बस्स... भारताकडून अमेरिकेला जशास तसं उत्तर मिळणार !
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के शुल्क लादल्यानंतर भारतातुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. ३१ जुलै रोजी ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर २५% कर लादला. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर काही निर्बंध लादले आणि शुल्क ५०% पर्यंत वाढवले. स्टील आणि अॅल्युमिनियमवरील कराचा वाद फेब्रुवारीपासून सुरू आहे. त्यानंतर ट्रम्प सरकारनं या धातूंवर २५% कर लादला. जूनमध्ये हा कर ५०% पर्यंत वाढवण्यात आला. यामुळे भारताच्या सुमारे ७.६ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.

अमेरिकेला जशास तसं उत्तर द्यावे अशी संतप्त प्रतिक्रिया भारतातून उमटत असताना आता भारत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. एका खासगी वृत्तानुसार, भारत अमेरिकेतून येणाऱ्या काही वस्तूंवर कर लादण्याची तयारी करत आहे. अमेरिकेनं भारतातून येणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवरील शुल्क ५०% नं वाढवल्यामुळे हे पाऊल उचललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेनं भारताचं जेवढं नुकसान केलं आहे तितकेच अमेरिकेतून येणाऱ्या काही वस्तूंवर भारत समान प्रमाणात कर लादेल. 

अमेरिकेनं 'राष्ट्रीय सुरक्षेच्या' नावाखाली हा कर लादला आहे, जो WTO च्या नियमांविरुद्ध असल्याचं भारतानं म्हटलंय. भारतानं म्हटलं आहे की हा एक प्रकारचा सुरक्षा उपाय आहे, परंतु तो WTO च्या नियमांचं उल्लंघन करतो. जेव्हा अमेरिका वाटाघाटी करण्यास तयार झाली नाही, तेव्हा भारतानं WTO च्या नियमांनुसार प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group