आयसीसीकडून धोनीला मिळाला सर्वात मोठा सन्मान ; ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये मिळालं  स्थान
आयसीसीकडून धोनीला मिळाला सर्वात मोठा सन्मान ; ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये मिळालं स्थान
img
DB
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयसीसीने धोनीचा मोठा सन्मान केला आहे.

सोमवारी लंडनमध्ये एका कार्यक्रमात धोनीचा ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करुन त्याचा गौरव करण्यात आला.

आयसीसीकडून एकूण 7 खेळाडूंना हा बहुमान देण्यात आला. या 7 खेळाडूंमध्ये 5 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. तसेच धोनी आयसीसीकडून हा सन्मान मिळवणारा एकूण 11 वा भारतीय (नववा पुरुष) खेळाडू ठरला आहे.

धोनीने टीम इंडियात 2004 साली पदार्पण केलं. धोनीने टीम इंडियाला 2007 सालचा पहिलाच वर्ल्ड कप त्याच्या नेतृत्वात मिळवून दिला. त्यानंतर धोनीने कर्णधार म्हणून 28 वर्षांची प्रतिक्षा संपवत 2011 साली आयसीसी वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला. तसेच 23 जून 2013 रोजी धोनीने टीम इंडियाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी महाअंतिम सामन्यात विजय मिळवून दिला. तसेच धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2009 साली पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group