भारतीय क्रिकेटविश्वावर शोककळा ! ३८ वर्षीय क्रिकेटरचा मृत्यू, सामना सुरू असताना...
भारतीय क्रिकेटविश्वावर शोककळा ! ३८ वर्षीय क्रिकेटरचा मृत्यू, सामना सुरू असताना...
img
वैष्णवी सांगळे
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.  एका ३८ वर्षीय क्रिकेटरच्या मृत्यूने भारतीय क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. मिजोरममध्ये सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत ही दुर्दैवी घटना घडली असून, राज्याकडून रणजी ट्रॉफी खेळलेले माजी क्रिकेटपटू के. ललरेमरुआटा यांचे निधन झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ८ जानेवारी रोजी मिजोरमच्या सेकंड डिव्हिजन स्पर्धेत ३८ वर्षीय ललरेमरुआटा सहभागी झाले होते. सामना सुरू असतानाच ते अचानक मैदानावर कोसळले आणि बेशुद्ध झाले. उपस्थितांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले , मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेवर मिजोरमचे क्रीडामंत्री यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. वेंगनुआई आणि चॉनपुई यांच्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान ललरेमरुआटा यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटूच्या निधनावर त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला सांत्वन व्यक्त केले.

दरम्यान, मिजोरम क्रिकेट असोसिएशननेही हळहळ व्यक्त केली आहे. असोसिएशनने सांगितले की, ललरेमरुआटा यांनी मिजोरमकडून रणजी ट्रॉफीत 2 सामने तर सैयद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीत एकूण 7 सामने खेळले होते. ललरेमरुआटा यांच्या कारकिर्दीकडे पाहिल्यास, त्यांनी 2018 मध्ये मिजोरमकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

मात्र त्यानंतर त्यांना पुढील रणजी सामना 2022 मध्ये खेळता आला. या सामन्यांमध्ये त्यांनी एकूण 17 धावा केल्या. तसेच 2019 ते 2021 या काळात त्यांनी विकेटकीपर-बल्लेबाज म्हणून 7 टी-20 सामने खेळत 87 धावा केल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group