Asia Cup Rising Stars 2026  : श्रीलंकेला हरवून भारताच्या लेकी फायनलमध्ये
Asia Cup Rising Stars 2026 : श्रीलंकेला हरवून भारताच्या लेकी फायनलमध्ये
img
वैष्णवी सांगळे
महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेचे थायलंडमधील बँकॉक येथे सध्या सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेत भारतीय महिला ‘अ’ संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत भारताचा सामना श्रीलंका महिला ‘अ’ संघाशी झाला आणि हा सामना भारताने एकतर्फी 5 विकेट्सनी जिंकला.

उपांत्य सामन्यात श्रीलंका ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांना धावा करणे कठीण गेले. संपूर्ण संघ 19.4 षटकांत अवघ्या 118 धावांत गारद झाला. श्रीलंकेकडून संजना कविंदीने 35 चेंडूत 31 धावांची झुंजार खेळी केली, तर शशिनी गिम्हानीने 17 चेंडूत 22 धावा केल्या. हंसिमा करुणारत्ने (14) आणि सथ्या संदीपनी (15) यांनीही थोडेफार योगदान दिले.

भारतीय गोलंदाजांमध्ये कर्णधार राधा यादव हिने 3.4 षटकांत 19 धावा देत 4 विकेट घेत श्रीलंकेचा डाव अक्षरशः उद्ध्वस्त केला. प्रेमा रावत हिने 4 षटकांत केवळ 9 धावा देत 2 बळी टिपले, तर तनुजा कंवर हिनेही 2 गडी बाद करत मोलाची साथ दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group