आपल्या धडाकेबाज फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या फिल सॉल्टने आरसीबीची साथ सोडली आहे. १८ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात बोटाला झालेली दुखापत सॉल्टला चांगलीच महागात पडली आहे. गेल्या तीन सामन्यांपासून संघाबाहेर असलेल्या सॉल्टला आता स्कॅनिंग आणि पुढील उपचारांसाठी तातडीने यूकेला (UK) पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी तीन महत्त्वाच्या सामन्यांत आरसीबीला आपल्या या हुकमी एक्क्याविना मैदानात उतरावे लागणार आहे.
आयपीएल 2026 च्या शेवटाला आता सुरूवात झाली आहे. सर्व संघाचे 9 सामने झाले असून आता शेवटचे चार सामने बाकी आहेत. अशातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा स्टार बॅटरने आयपीएलच्या मध्यातच टीमला वाऱ्यावर सोडलं असून तो आता थेट इंग्लंडला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून फिल सॉल्ट आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सलामीवीर फिल सॉल्ट याने आयपीएल 2026 च्या हंगामात आतापर्यंत अत्यंत स्फोटक बॅटिंग केली आहे. सॉल्टचा या हंगामातील स्ट्राईक रेट 168.33 इतका जबरदस्त राहिलाय. 18 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये फिल्डिंग करताना सॉल्टला दुखापत झाली. बाऊंड्रीवर बॉल अडवताना त्याच्या बोटाला मार लागला. या दुखापतीमुळे तो गेल्या 3 मॅचमध्ये खेळू शकला नाही. फिल सॉल्ट अचानक स्कॅनिंग आणि पुढील उपचारांसाठी यूकेला रवाना झाल्याने आता तो आगामी तीन महत्त्वाच्या सामन्यात खेळू शकणार नाही, अशी माहिती आरसीबीकडून समोर आली आहे.