मिचेल स्टार्कची वर्ल्ड क्लास कामगिरी, मोठा विक्रम मोडला
मिचेल स्टार्कची वर्ल्ड क्लास कामगिरी, मोठा विक्रम मोडला
img
वैष्णवी सांगळे
मिचेल स्टार्कने पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज वसीम अक्रमचा विक्रम मोडीत काढला आहे. इतकंच काय तर त्याच्यापेक्षा दोन सामने कमी खेळत हा विक्रम रचला आहे. त्यामुळे वसीम अक्रमचा सर्वाधिक कसोटी घेण्याचा विक्रम आता स्टार्कच्या नावावर झाला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मिचेल स्टार्कने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. पिंक बॉल कसोटीत इंग्लंडच्या हॅरी ब्रूकची विकेट काढली आणि हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.

कसोटीत डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून पाकिस्तानच्या वसीम अक्रमने 104 सामन्यात 23.62 च्या सरासरीने 414 विकेट घेतल्या होत्या. मात्र आता मिचेल स्टार्कने त्याला मागे टाकलं आहे. कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा गोलंदाज ठरला आहे. 

गाबा कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याचा मानही मिचेल स्टार्कला मिळाला आहे. शेन वॉर्न आणि ग्लेन मॅक्ग्रा यांच्यानंतर तिसरा गोलंदाज ठरला आहे. नाथन लायनला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे. इतकंच काय तर पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा मानही त्याला मिळाला आहे.
sports |
इतर बातम्या
Join Whatsapp Group