टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर रॅलीत व्यंकटेश शेट्टी मुबई  विजेता तर देवेंद्र गुंजाळ  नाशिक फर्स्ट टायमर विजेता
टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर रॅलीत व्यंकटेश शेट्टी मुबई विजेता तर देवेंद्र गुंजाळ नाशिक फर्स्ट टायमर विजेता
img
Dipali Ghadwaje


नाशिक ( प्रतिनिधी ) :   येथील सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात  झालेल्या  टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर रॅली मध्ये मुंबईच्या वेंकटेश शेट्टी याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर नाशिकच्या देवेंद्र गुंजाळ याने फर्स्ट टायमरचे पारितोषिक पटकावले . 
 
या स्पर्धेत पाऊस नसल्याने नाशिककर स्पर्धक बरोबर बाहेरील शहरातून आलेल्या स्पर्धकांची चांगलीच कसब बघायला मिळाली . दिवंगत शशांक शेवाळे  यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . ही स्पर्धा फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया ( एफ एम एस सी आय ) या भारत सरकारच्या मान्यताप्राप्त शिखर संस्थेच्या निकषानुसार झाली  . 
   
 या स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉक्टर अक्षय पाटील , वसं टोयोटा चे बेदी , केव्हज काऊंटी चे राजवर्धन देवरे ,दिलीप शेवाळे  यांच्या हस्ते करण्यात आले .  विल्होळी येथील केव्हज् काऊंटी रिसॉर्ट येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला . स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा प्रमुख कौस्तुभ मत्से ,सुरज कुटे , हर्षल कडभाने, आनंद बनसोडे, मित सूर्यवंशी, अनिश नायर ,शमीम खान यांच्या बरोबर  इतर सहकारी काम बघितले . 

 स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे . 
   क्लास एस 
 प्रथम रोहन ठाकूर मुंबई  , द्वितीय  निलेश ठाकरे नाशिक, तृतीय अन्वर अन्नू भोपाळ . 
   क्लास एस १ 
प्रथम मोहम्मद अनिस भोपाळ ,द्वितीय हेमंत मोरे पुणे ,तृतीय हितेन ठक्कर नाशिक . 
    क्लास एस २ 
प्रथम व्यंकटेश शेट्टी मुंबई ,द्वितीय किशोर जाधव पुणे ,तृतीय मुजफ्फर अली भोपाळ . 
   क्लास एस ३ 
प्रथम दर्शन चौरे नासिक , द्वितीय झिशांत सय्यद मुंबई ,तृतीय तेजस कदम मुंबई . 
   क्लास एस ४ 
प्रथम पूजा खरे नासिक द्वितीय गीता पाटील नाशिक तृतीय कीर्ती तांडेले नाशिक
   क्लासएस ५   
प्रथम लोकेश भोसले पुणे , द्वितीय अमरेंद्र साठे पुणे , तृतीय हितेश घाटके  पुणे.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group