पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येथे भव्य स्टेडियम बांधल्यास लोकांची संख्या वाढेल, रोजगार उपलब्ध होईल, ज्याचा फायदा माझ्या काशीला होईल. याशिवाय दुकानदार, टॅक्सी चालक, बोट मालक यांनाही फायदा होणार आहे. देशाच्या विचारसरणीत खूप बदल झाला आहे, त्याचाच परिणाम म्हणून आज भारत क्रीडा क्षेत्रात अधिक यशस्वी होत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह उपस्थित होते. त्याशिवाय भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर आणि कपिल देव उपस्थित होते.
स्टेडिअम तयार करण्याची प्रेरणा भगवान शिवाकडून...
वाराणसीमध्ये गंजरी, राजतलब येथे 30 एकर जागेत सुमारे 450 कोटी रुपये खर्चाने हा आधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारला जाणार आहे. या स्टेडियमच्या रचने संदर्भातली प्रेरणा ही भगवान शिवाकडून घेण्यात आली असून यासाठी विविध प्रकारच्या रचना विकसित केल्या जाणार आहेत, यात चंद्रकोरीच्या आकाराचे छताचे आवरण असेल, त्रिशुळाच्या आकाराचे फ्लड-लाइट (प्रकाश योजना), घाटाच्या पायऱ्यांवर आधारित आसन व्यवस्था, स्टेडियमच्या दर्शनी भागावर बिल्वपत्राच्या (बेलाच्या पानाच्या) आकाराचे धातूचे पत्रे बसवले जातील. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ही 30,000 पर्यंत अस ?
वाराणसीमध्ये गंजरी, राजतलब येथे 30 एकर जागेत सुमारे 450 कोटी रुपये खर्चाने हे आधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने भूसंपादनासाठी १२१ कोटी रुपये खर्च केले आहेत. तर बीसीसीआय स्टेडियम बांधण्यासाठी 330 कोटी रुपये खर्च करणार आहे.