मोठी बातमी ! पाकिस्तानच्या हल्ल्यात ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
मोठी बातमी ! पाकिस्तानच्या हल्ल्यात ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
img
वैष्णवी सांगळे
क्रिकेटविश्वातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमारेषेवर सुरु असलेल्या लष्करी संघर्ष आता प्रचंड चिघळला आहे. पाकिस्तानने शुक्रवारी अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात तीन क्रिकेटपटू ठार झाले. या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात संतापाची लाट उसळली आहे. 


या घटनेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबत होणाऱ्या टी-20 तिरंगी मालिकेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. ही मालिका नोव्हेंबर महिन्यात होणार होती. मात्र, अफगाणिस्तानने या स्पर्धेतून माघार घेत क्रिकेट आणि रक्तपात एकत्र नांदू शकत नाही, असा रोखठोक संदेश दिला आहे. 

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात तीन क्लब-स्तरीय क्रिकेट खेळाडू ठार झाले आणि इतर चार जण जखमी आहे. हे खेळाडू पक्तिका येथील शराणा येथे सामना संपवून अर्गुनला परतत असताना हल्ला झाला.

तर दुसरीकडे हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा कतारच्या मध्यस्थीने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धबंदी आणि शांतता चर्चा सुरू होती. मात्र पाकिस्तानने युद्धबंदी जाहीर केली असताना, त्यांनी अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला.


इतर बातम्या
Join Whatsapp Group