नाशिकच्या साहिल पारखला आयपीएल मध्ये
नाशिकच्या साहिल पारखला आयपीएल मध्ये "या" संघाने खरेदी केले
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी)- आयपीएल 2026 च्या हंगामासाठी नाशिकचा डावखुरा खेळाडू साहिल पारखला दिल्ली कॅपिटल या संघाने 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे.

मागील आठवड्यात आयपीएलच्या संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर या यादीमध्ये डावखुरा तडाखेबंद फलंदाज साहिल पारखचे नाव होते. आज होणाऱ्या लिलावाकडे नाशिककरांचे यामुळे लक्ष लागले होते.

त्यातच साहिलला खरेदी केल्यामुळे नाशिककरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group