नाशिक:- मनपा निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला ७.३० वाजता सुरुवात झाली आहे. किरकोळ तांत्रिक अडचणी वगळता मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिकमध्ये सकाळी 07:30 ते 9:30 पहिल्या 2 तासात 6.50 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.